Thursday, February 9, 2012

चेहरा...........

दुरूनच पाहिलं,
कोणाबरोबर तरी तो जात होता,
आवाजाची चाहूल घेतली,
बहुधा काहीतरी गुणगुणत होता....
स्वतःच्याच धुंदी मध्ये,
असा काही गुंगला होता,
थोडा निरखून पाहिलं,
त्याच चेहरा उतरलेला होता......
एकट्यानेच चालताना,
सारखा सारखा धडपडत होता,
जगासमोर हसताना,
स्वतःशीच रडत होता........
दुरून नीट दिसत नव्हतं,
चेहरा धुक्याआड लपला होता,
जवळ जावून पाहिलं,
तो माझाच चेहरा होता.........