Wednesday, December 8, 2010

आर्जव....

ते धुंद स्वप्न प्रीतीचे माझे तू उजळून जा,
या धुंद माझ्या प्रीतीत सदाही तू हरवून जा...

भावनांची धुंद माझ्या हो फुले तुझ्या गाली,
प्रीतीच्या गजरयात ही, फुले तू माळून जा..

बासरी मी, धून तू मधुर त्या बासरीची,
प्रीतीला या बासरीची मधुरता सांगून जा....

वसंत माझ्या प्रीतीचा फुलारला जीवनी,
वसंती या पुष्पासम सदाही तू बहरून जा...

--राजा जोशी

आठव..

सोबत आता आपुली, अशी कितीशी राहिली,
आयुष्याच्या मध्यान्ही, तिन्हीसांज जाहली...

ध्यास होता वादळाला कवेत घेण्याचा,
हातास आठवणींची, धूळ थोडी लागली..

आठवतो क्षण तो, जेंव्हा होतो आपण भेटलो,
पावसाने अंतरीची आग सारी जाळली...

भावनाचे पूर सारे, कधीच आटून गेले,
याद आली तुझी, मग पापणी ओलावली...

दूर गेले विश्व सारे, नुरले माझे न काही,
भरदिवसा पायतळी, वाट अन अंधारली...

--राजा जोशी

Tuesday, December 7, 2010

हार माझी ....

हार माझी ....

काय मी सांगू तुलारे, शब्द सारे संपले,
पोचवू भावना कश्या? भाव सारे आटले...

चांदण्या रात्रीतली मी धुंदी कधी न पाहिली,
अन स्पर्श निशावायुचे मज कधी न लाभले...

वाट सारी संपून गेली, पाय आता थांबले,
दूर क्षितीजावरी ते चंद्रबिंबहि लोपले...

मी करंटी आज, भार झाला माझा मला,
त्या दिव्यांनी का जळावे? प्राण जरी मी ओतले....

तू राहा तेथे सुखाने, आहेस जेथे राजसा,
विरहाने तुझ्या मग, हृदय जरी हे पेटले.....

--- राजा जोशी

Tuesday, November 23, 2010

परत.....

पाण्यात पाहताना प्रतिबिंब आपुले ते,
माझ्याच दो करांनी, हळुवार झाकले ते...
हृदयात भावनांचा कल्लोळ आज झाला,
जे काल प्रेम होते, आताच आटले ते...
मेघात काल होती निःशब्द शांतता ती,
गरजे आता असा कि, आभाळ फाटले ते..
वाटेवरी सुखाच्या सारी फुले उधळली,
जळतात पाय तेथे, अंगार भासले ते...
येथून दुःख होते मीच माझे टाकले,
हळुवार पावलांनी, येथेच भेटले ते...

Wednesday, November 17, 2010

आई-बाबा सांगाना, तुम्ही असं का केलंत?

आई-बाबा सांगाना, तुम्ही असं का केलंत?
जगाच्या पसाऱ्यात, आम्हाला एकट सोडून दिलंत..
आम्ही असं काय केलं? म्हणून आम्हाला ही शिक्षा दिली?
आम्हावर केलेल्या प्रेमाची अशी परीक्षा का घेतली?
स्वप्नांचे मनोरे रचायला अजून सुरुवातही केली नाही,
आणि जगात उभं राहण्याची तयारीही झाली नाही..
छोटू किती लहान आहे, अजून चालूही शकत नाही,
आणि आयुष्य पेलण्याची, अजून माझ्यात ताकद नाही..
आमच्या साठी तुम्ही दोघ, सारं काही करत होता,
फक्त आमच्या सुखासाठी, रात्रंदिवस राबत होता...
तुम्हाला चिंता असावी आपल्या बाळांच कसं होईल,
पण दयेवर जगताना आता, आमची अवस्था काय होईल?
समजत होतं आम्हाला, आपल्याकडे फार काही नव्हतं,
पण आम्हालाही तुमच्या शिवाय, दुसरं काही नको होतं...
सगळेच आई-बाबा असं करतात? मला तसं वाटत नाही,
तुम्हीच असं का केलंत, मला अजून समजत नाही..
सांगाना बाबा? आता आम्ही काय करायचं?
कोणत्या आधारावर जगायचं? कि तुमच्याकडेच यायचं?
या घराला आता फक्त पडक्या भिंती उरल्या आहेत,
कोसळलेल्या छपराखाली, साऱ्या आकांक्षा पुरल्या आहेत....
उजळणार्या पूर्वेला माझी सतत नजर होती,
आणि याचवेळी, आम्हाला तुमची खूप गरज होती...
फार काही भव्य स्वप्ने मी पाहत नव्हतो,
तुम्हाला अभिमान वाटेल, अशाच गोशी करत होतो...
तुम्हीतर निघून गेलात, परत काही येणार नाही,
पण छोटुला कसं समजावू? त्याला हे पटणार नाही...
व्हायचं ते होऊन गेलं, आता रडून उपयोग नाही,
हेच खरं कि तुमच्या आधाराचा, माझ्या नशिबात योग नाही....
आता मला दुख्खाला आवर घालायलाच हवा...
अन्कुरणाऱ्या त्या कोम्बाला, भक्कम आधार द्यायला हवा..
झाड आणि वेली सारखे, एकमेकांना आधार देवू,
आयुष्याच्या नौकेला, या वादळातूनहि पार नेवू..
तुमचे आशीर्वाद असल्यावर पायात हत्तीचे बळ येईल,
तुम्ही लावलेल्या रोपांना, निर्मळ यशाचे फळ येईल...
आई, बाबा, तुमचे संस्कार वाया जावू देणार नाही,
संकटाना भिवून, कधीच माघार घेणार नाही...
कधीच माघार घेणार नाही.....

Monday, July 5, 2010

जीत.........

माझ्याच पावलांना मी आज भीत आहे,
उलटीच या जगाची न्यारीच रीत आहे...

आवाज हा कुणाचा? या कुणाच्या घोषणा?
आक्रोश दाबण्याची, ही त्यांचीच रीत आहे.

फेकला जरी पुढे हा तुकडा मला दयेचा,
चितेवरीच माझ्या यांचे शिजणार शीत आहे.

मुकलो जरी असे मी भेटीस आज माझ्या,
फुत्कार टाकणारे ते माझेच गीत आहे.

गेला बळी कुणाचा? अन संसार ध्वस्त झाले,
खुर्चीवरी परंतु, यांची जडली ती प्रीत आहे...

हरलो जरी असे मी, डाव सारे जीवनाचे,
हरण्यात जीवनाच्या, माझीच जीत आहे....

---------- राजा जोशी

कोण हे ?

रक्तानी त्यांनी शिम्पिल्या जमिनी, अन अंकुर यांचे फुटले,
विसरुनी ते उपकार यांनी लाभलेले सर्वस्व लुटले....

नव्हत्या का त्यांना अपेक्षा समृद्धीस पाहण्याच्या,
पण मीच केले मीच केले, दुराभिमानाचे पेव फुटले....

सर्व त्यांच्या योजनांचा उडविला यांनी बोजवारा....
पाहण्यापूर्वी सर्वनाश हा, बरे त्यांचे डोळे मिटले.....

विस्मृतीत टाकले त्यांना, दाविती हे यांचेच चेहरे,
यांचाच यांनी पिटला डंका, एकूण सारे कान किटले.....

विनवणी आता तुम्हास जन हो, फाडून टाका यांचे बुरखे,
कळू देत जगतास साऱ्या, फुल कुठले अन काटे कुठले.....

कोण हे ?

रक्तानी त्यांनी शिम्पिल्या जमिनी, अन अंकुर यांचे फुटले,
विसरुनी ते उपकार यांनी लाभलेले सर्वस्व लुटले....

नव्हत्या का त्यांना अपेक्षा समृद्धीस पाहण्याच्या,
पण मीच केले मीच केले, दुराभिमानाचे पेव फुटले....

सर्व त्यांच्या योजनांचा उडविला यांनी बोजवारा....
पाहण्यापूर्वी सर्वनाश हा, बरे त्यांचे डोळे मिटले.....

विस्मृतीत टाकले त्यांना, दाविती हे यांचेच चेहरे,
यांचाच यांनी पिटला डंका, एकूण सारे कान किटले.....

विनवणी आता तुम्हास जन हो, फाडून टाका यांचे बुरखे,
कळू देत जगतास साऱ्या, फुल कुठले अन काटे कुठले

का केलंस असं..

एकदा तरी मागे वळून पाहायचं होतंस.....
निदान मी कसा जळत होतो ते पाहायला....
तुझ्या तिरस्कारातील तो विखार जहाल होता...
क्षणार्धात त्यानं मला पेटवलं...
आभाळ फाटून कोसळणाऱ्या पावसात,
एकही ठिणगी न पाडता...
पण ते जळणं वेदनामय होतं...
तू मला धुमसत ठेवलंस...
भडकण्यात मला सुख मिळालं असतं....
मागे काहीच उरलं नसतं...
पण आता उरलं फक्त आयुष्याचा चिखल....
सर्वांनी तुडविण्यासाठी....
आजूबाजूच्या केर-कचऱ्यात...
पालापाचोळयात....
दगड-मातीत मिसळून जाणारा...
माझं अस्तित्वच नाकारणारा....
तुला बहुधा तेच हवं होतं.....
आयुष्यात फक्त प्रेम हवं म्हणून सांगणाऱ्या तुझ्याकडून,
हे किती अनपेक्षित होतं.....

................राजा जोशी

Friday, July 2, 2010

खंत...

आयुष्याच्या वाळवंटात
अश्रूंचा पूर.....
आयुष्य वाहून गेलं तरीही
हृदय मात्र कोरडच...
त्याची तहान वेगळी...
मायेच्या ओलाव्याची....
झेपत नाही त्याला अश्रूंचा लोट..
सगळंच धुवून जातं...
मागे उरत नाही एकही निशाणी...
......खोल खोल घावांची....
आणि ओरखड्यांची.....
मग मागे वळून काय पाहायचं ?
जे आपलं कधीच नव्हतं...
जी नजर परकी होती.....
आभास कि वास्तव....
एव्हढ्या भयानक पुरात वाकुल्या दाखवून हसणारे
ते निःशब्द उसासे.....
काहीच न मिळाल्याने खंतावणारे...
आणि जाळून सुद्धा अस्तित्व दाखवणारे...
उसाच्या सडा सारखे.....

Friday, June 18, 2010

निरोप......

डोळ्यात आज अश्रूंना सजविले पाहिजे,
दिवे सारे निमाले, मज स्वतःच जळले पाहिजे.

समजू नको मला कि विरहात सुख आहे,
जगता समोर मजला, पण हसलेच पाहिजे.

पुन्हा एक रिती कोरडी सांज गेली,
मनास आता मला, समाजावालेच पाहिजे.

रक्ताने लिहीन तुझे नाव माझ्या कबरीवरी,
कबरीस त्या फुलांनी तू सजविले पाहिजे.

युगामागुनी युगे तुझ्या प्रतीक्षेत गेली,
संपले आयुष्य आता, मज परतले पाहिजे.....

निरोप......

डोळ्यात आज अश्रूंना सजविले पाहिजे,
दिवे सारे निमाले, मज स्वतःच जळले पाहिजे.

समजू नको मला कि विरहात सुख आहे,
जगता समोर मजला, पण हसलेच पाहिजे.

पुन्हा एक रिती कोरडी सांज गेली,
मनास आता मला, समाजावालेच पाहिजे.

रक्ताने लिहीन, नाव तुझे नाव माझ्या कबरी वरी,
कबरीस त्या फुलांनी तू सजविले पाहिजे.

युगामागुनी युगे तुझ्या प्रतीक्षेत गेली,
संपले आयुष्य आता, मज परतले पाहिजे.....

------- राजा जोशी

Tuesday, June 15, 2010

सर्व दहावी आणि बारावीच्या मित्र-मैत्रीणीना.....

सर्व दहावी आणि बारावीच्या मित्र-मैत्रीणीना.....

आता आपल्या आयुष्याची सकाळ झाली,
पहाटेच्या गोड स्वप्नांची वाट दिसू लागली.
दंगा, मस्ती, भांडणे आता विसरायला हवी,
प्रत्येकाची इथून आहे, वाट आता वेगळी.
नवी वाट, नवे जग, मित्रही असतील नवे,
पण आपल्या कोवळ्या मैत्रीला, आपण जपायला हवे...
प्रत्येकाचे जग आता आपले स्वतःचे असेल,
पण मित्रांसाठी त्यात एक खास जागा असेल.
येथपर्यंत साऱ्यांनी सोबत प्रवास केला,
जाणवलेपण नाही, कसा पटकन वेळ गेला.....
आपण आपले कधीच नव्हतो, एकमेकांचे होतो,
एकमेकांच्या आयुष्यात स्वतःला शोधत होतो.....
आता मात्र आपल्याला स्वतःला घडवायचे आहे,
तीव्र स्पर्धेच्या युगात, स्वतःला शोधायचे आहे.
मळलेल्या वाटेच्या गुंत्यातून एक नवी वाट शोधायची,
आपल्या मागून येणाऱ्यांसाठी मऊ मखमली बनवायची..
कधी कधी असेही घडेल, पुढची वाट दिसणार नाही,
पण मित्रानो, असे नाही कि पुढे वाटच असणार नाही....
वाटेतल्या धोक्यांना वेळीच ओळखायला हवे,
अपघाता आधीच, आपण त्यांना टाळायला हवे.....
जेंव्हा कधी तुम्हाला मला भेटावेसे वाटेल,
फक्त आठवण केलीत तरी मला लगेच जाणवेल.....
एकाच विनंती मित्रानो, मला कधी विसरू नका,
भांडलो असेन तुमच्याशी, आता मनात राग धरू नका.
तुमच्या मैत्रीच्या शिदोरीवरच मी पुढे जाणार आहे,
शप्पथ सांगतो, प्रत्येक वेळी तुमची आठवण येणार आहे...
भेटतील मलाही पुढे आयुष्यात मित्र नवे,
पण नुसतेच नवे नकोत, जुनेही सारे हवे....
एकमेकावरील सारा राग आता सोडून देवू,
प्रवासाला निघण्य आधी, कडकडून भेटून घेवू....
किती बोलू किती नको, मनात भावना ओथांबालेल्या
कितीतरी गोष्टी आहेत, ओठावरच थांबलेल्या....
आत्ता नाही सांगणार त्या, सगळेच नसते सांगायचे,
पुढच्या भेटीसाठी आपल्या काहीतरी ठेवायचे....
चला आता वेळ झाली, निरोप देण्या-घेण्याची,
पुन्हा कधी भेटायचं, ती वेळ ठरविण्याची.....