माझ्याच पावलांना मी आज भीत आहे,
उलटीच या जगाची न्यारीच रीत आहे...
आवाज हा कुणाचा? या कुणाच्या घोषणा?
आक्रोश दाबण्याची, ही त्यांचीच रीत आहे.
फेकला जरी पुढे हा तुकडा मला दयेचा,
चितेवरीच माझ्या यांचे शिजणार शीत आहे.
मुकलो जरी असे मी भेटीस आज माझ्या,
फुत्कार टाकणारे ते माझेच गीत आहे.
गेला बळी कुणाचा? अन संसार ध्वस्त झाले,
खुर्चीवरी परंतु, यांची जडली ती प्रीत आहे...
हरलो जरी असे मी, डाव सारे जीवनाचे,
हरण्यात जीवनाच्या, माझीच जीत आहे....
---------- राजा जोशी
No comments:
Post a Comment