Monday, July 5, 2010

का केलंस असं..

एकदा तरी मागे वळून पाहायचं होतंस.....
निदान मी कसा जळत होतो ते पाहायला....
तुझ्या तिरस्कारातील तो विखार जहाल होता...
क्षणार्धात त्यानं मला पेटवलं...
आभाळ फाटून कोसळणाऱ्या पावसात,
एकही ठिणगी न पाडता...
पण ते जळणं वेदनामय होतं...
तू मला धुमसत ठेवलंस...
भडकण्यात मला सुख मिळालं असतं....
मागे काहीच उरलं नसतं...
पण आता उरलं फक्त आयुष्याचा चिखल....
सर्वांनी तुडविण्यासाठी....
आजूबाजूच्या केर-कचऱ्यात...
पालापाचोळयात....
दगड-मातीत मिसळून जाणारा...
माझं अस्तित्वच नाकारणारा....
तुला बहुधा तेच हवं होतं.....
आयुष्यात फक्त प्रेम हवं म्हणून सांगणाऱ्या तुझ्याकडून,
हे किती अनपेक्षित होतं.....

................राजा जोशी

No comments:

Post a Comment