Thursday, March 8, 2012

कमी....

तुझी विनवणी करायला, माझ्याकडे शब्द ही कमीच आहेत,
तुझी स्वप्नं रंगवायला, इंद्रधनुकडे रंगही कमीच आहेत....
तुझी स्वप्नं भव्य आहेत, अन मी त्यात कुठेही नाही,
तुझा क्षितीज पाहण्यासाठी, माझी उंचीही कमीच आहे....
बाहेरच जग पाहताना, तुझं आतलं सारं विखरून गेलंय,
मला तुझ्याशिवाय काहीच दिसलं नाही, माझी नजरही कमीच आहे,,,
तुझ्यावरच प्रेम मी तुला कधी सांगितलंच नाही,
तुझ्या " आपल्या " माणसापेक्षा, माझ्याकडे खूप काही कमीच आहे...
आतून पेटलेलो असताना, तू मला जळू सुद्धा दिलं नाहीस,
भडकलेल्या वणव्यातसुद्धा, धग अजून कमीच आहे...
कोण कुठचा परका मी, तुझ्यात का गुंतलो होतो,
तुझी आठवण पुसायला, माझे अश्रूही कमीच आहेत.....