Tuesday, November 23, 2010

परत.....

पाण्यात पाहताना प्रतिबिंब आपुले ते,
माझ्याच दो करांनी, हळुवार झाकले ते...
हृदयात भावनांचा कल्लोळ आज झाला,
जे काल प्रेम होते, आताच आटले ते...
मेघात काल होती निःशब्द शांतता ती,
गरजे आता असा कि, आभाळ फाटले ते..
वाटेवरी सुखाच्या सारी फुले उधळली,
जळतात पाय तेथे, अंगार भासले ते...
येथून दुःख होते मीच माझे टाकले,
हळुवार पावलांनी, येथेच भेटले ते...

No comments:

Post a Comment