Tuesday, June 15, 2010

सर्व दहावी आणि बारावीच्या मित्र-मैत्रीणीना.....

सर्व दहावी आणि बारावीच्या मित्र-मैत्रीणीना.....

आता आपल्या आयुष्याची सकाळ झाली,
पहाटेच्या गोड स्वप्नांची वाट दिसू लागली.
दंगा, मस्ती, भांडणे आता विसरायला हवी,
प्रत्येकाची इथून आहे, वाट आता वेगळी.
नवी वाट, नवे जग, मित्रही असतील नवे,
पण आपल्या कोवळ्या मैत्रीला, आपण जपायला हवे...
प्रत्येकाचे जग आता आपले स्वतःचे असेल,
पण मित्रांसाठी त्यात एक खास जागा असेल.
येथपर्यंत साऱ्यांनी सोबत प्रवास केला,
जाणवलेपण नाही, कसा पटकन वेळ गेला.....
आपण आपले कधीच नव्हतो, एकमेकांचे होतो,
एकमेकांच्या आयुष्यात स्वतःला शोधत होतो.....
आता मात्र आपल्याला स्वतःला घडवायचे आहे,
तीव्र स्पर्धेच्या युगात, स्वतःला शोधायचे आहे.
मळलेल्या वाटेच्या गुंत्यातून एक नवी वाट शोधायची,
आपल्या मागून येणाऱ्यांसाठी मऊ मखमली बनवायची..
कधी कधी असेही घडेल, पुढची वाट दिसणार नाही,
पण मित्रानो, असे नाही कि पुढे वाटच असणार नाही....
वाटेतल्या धोक्यांना वेळीच ओळखायला हवे,
अपघाता आधीच, आपण त्यांना टाळायला हवे.....
जेंव्हा कधी तुम्हाला मला भेटावेसे वाटेल,
फक्त आठवण केलीत तरी मला लगेच जाणवेल.....
एकाच विनंती मित्रानो, मला कधी विसरू नका,
भांडलो असेन तुमच्याशी, आता मनात राग धरू नका.
तुमच्या मैत्रीच्या शिदोरीवरच मी पुढे जाणार आहे,
शप्पथ सांगतो, प्रत्येक वेळी तुमची आठवण येणार आहे...
भेटतील मलाही पुढे आयुष्यात मित्र नवे,
पण नुसतेच नवे नकोत, जुनेही सारे हवे....
एकमेकावरील सारा राग आता सोडून देवू,
प्रवासाला निघण्य आधी, कडकडून भेटून घेवू....
किती बोलू किती नको, मनात भावना ओथांबालेल्या
कितीतरी गोष्टी आहेत, ओठावरच थांबलेल्या....
आत्ता नाही सांगणार त्या, सगळेच नसते सांगायचे,
पुढच्या भेटीसाठी आपल्या काहीतरी ठेवायचे....
चला आता वेळ झाली, निरोप देण्या-घेण्याची,
पुन्हा कधी भेटायचं, ती वेळ ठरविण्याची.....

No comments:

Post a Comment