शोधिले आयुष्य सारे तुझ्या प्रश्नाच्या उत्तराला,
सुटलेल्या प्रश्नातून मग एक नवा प्रश्न आला.......
पेटलेले शब्द तुझे, आयुष्य सारे विझवून गेले,
बोटांनी निखारयांच्या मग आधार मजला दिला....
उधारीच्या वहीतला तो शेवटचाच रकाना,
कर्ज माझ्या आयुष्याचे मला जाणवून गेला....
आजही होते मला तुला काही सांगायचे,
प्रत्यंचेवर चढण्या आधी भात्यात शब्द गेला.....
हातात आपल्या होते ते अर्ज निरोपाचे,
सदिच्छा देण्यास सारा पूर माणसांचा आला....

प्रथमेश,खुपच छान लिहिले आहे.
ReplyDeleteमाझ्या ब्लॉगचा पत्ता:
http://www.prashantredkarsobat.blogspot.com/