Monday, October 1, 2012

निरोप....

निरोप घेणं कधीच सोपं नसतं,


तो घ्यायच्या क्षणी ते जाणवत असतं,

असह्य वेदनेची काळ हृदयात उठते,

जेंव्हा माझं मन तुला कळत नसतं......



गेलेल्या प्रत्येक क्षणाची आठवण येते,

अचानक कोठूनतरी वादळ येते,

माझ्या झाकोळलेल्या आयुष्याला लाभलेली तुझी किनार,

डोळा लावतो न लावतो, तोच काळवंडून जाते...



तुला हृदयात अशा जागी मी ठेवलं होतं,

पण तुला ते कधीच समजलं नव्हतं,

खरंतर सारी चूक माझीच होती,

कारण प्रेमाचा मी कधी प्रदर्शन केलं नव्हतं....

No comments:

Post a Comment