Monday, February 10, 2014

एकटेपणा..........

छळतो मलाच माझा हा एकटेपणा,
स्पर्शून जाय साऱ्या, जखमा जुन्या पुन्हा.....

सारे हिशोब झाले त्या गुंतल्या क्षणांचे,
बाकीत कर्ज येथे, दिसते कसे पुन्हा?

अंधार शोधताना, लपवावयास अश्रू,
दिवे ओळखीचे, दिसती तिथे पुन्हा......

सूर्यास विनविले मी, उगवू नको अवेळी,
रात्रीसवे हा माझा झगडा जुना पुराणा....

हातास तुझ्या सुऱ्याचा, नाही सराव अजुनी,
परतून वार जातो, न साधितो निशाणा....

मैफिल संपलेली सांगून भैरवी गेली,
मी आठवीत होतो, अजुनी जुना तराणा.......

खांद्यावरून माझे मी प्रेत वाहिले अन,
जाळल्या चितेत माझ्या, उरलेल्या वेदना....

No comments:

Post a Comment